पुणे सार्वजनिक सभा
२ एप्रिल १८७० पुणे सार्वजनिक सभा ची स्थापना .सामाजिक कामासाठी लोकांच्या प्रतिनिधींची (मुखत्यार) असावी अशी या संस्थेच्या स्थापने मागची भूमिका .संस्थापक गणेश वासुदेव जोशी उपाख्य सार्वजनिक काका. प्रथम अध्यक्ष श्रीमंत श्रीनिवासराव पंतप्रतिनिधी. कार्यकारी मंडळात ख्रिस्ती पारशी मुसलमान इत्यादी मंडळींचा सुद्धा समावेश होता सार्वजनिक सभेचा प्रसार इतका होता की एक जून १८७३ रोजी भुसावळ येथे भुसावळ सार्वजनिक सभा स्थापन झाली.
सन १८७२ स्वदेशीच्या व्रताचा प्रसार सार्वजनिक सभेकडून निर्धाराने केला गेला. स्वतः काकांनी अखेरपर्यंत स्वदेशी वस्तूचा वापर केला.
सन १८७३ स्त्री विचारवती सभा स्थापून पुणे सार्वजनिक सभेने सामाजिक सुधारणेच्या दृष्टीने सर्व जातीमधील स्त्रियांसाठी पहिले हळदीकुंकू आयोजित केले. पाच हजार बहुजन समाजातील महिला उपस्थित होत्या.
स्थापना ( Year )
सभासद ( Member )
कै. गणेश वासुदेव जोशी ( सार्वजनिक काका )
ब्रिटिशांच्या जुलमी राजवटीत परकीय वस्तूंच्या होळ्या करून स्वदेशी वस्तू निर्मितीस प्रोत्साहन देणारे देशभक्त गणेश वासुदेव जोशी उर्फ सार्वजनिक काका यांचा जन्म २० जुलै १८२८ रोजी गणेश चतुर्थीला सातारा येथे झाला ,त्यांच्या जन्मानंतर त्यांचे वडील पुण्यात आले आणि सरदार हरीपंत देशमुख यांच्याकडे नोकरी करू लागले, आर्थिक परिस्थिती बिकट असल्याने व सरदारांचे महत्त्व कमी झाल्याने त्यांनी नंतर इंग्रजांची नोकरी पत्करली. सेवानिवृत्तीनंतर त्यांना साडे सदतीस रुपये पेन्शन मिळू लागली , १८३० साली वडिलांचे निधन झाले त्यानंतर त्यांच्या पत्नीस म्हणजे गणेश वासुदेव जोशी यांच्या मातोश्रीस निम्मी पेन्शन मिळू लागली .
गणेश जोशींचे प्राथमिक शिक्षण साताऱ्यात झाले .मोडी लिहिणे ,वाचणे, बेरीज वजाबाकी ,गुणाकार ,भागाकार ,तोंडी हिशोब एवढ्या शिक्षणावर सरकारी नोकरी मिळत असे. शिक्षण चालू असतानाच गणेश जोशी यांना कोर्टात नाझर म्हणून नोकरी मिळाली. त्यांनी त्याच काळात इंग्रजी भाषा ही चांगली आत्मसात केली ,पण नोकरीत ते समाधानी नव्हते. तरीपण कोर्टातील कामामुळे त्यांना तेथील बरीच माहिती झालेली होती ,त्यामुळे त्यांनी घरीच अभ्यास करून सन १८६१ साली वकिलीची परीक्षा दिली. त्यावेळी १०४ जणांपैकी १९ जणांना सनद मिळाली त्यामुळे गणेश वासुदेव जोशी हे वकील म्हणून काम करू लागले. ते फौजदारी आणि दिवाणी असे खटले चालवू लागले त्यांनी समाजात नामांकित वकील म्हणून नाव कमावले.
संस्थेच्या मदतीसाठी
फोटो गॅलरी
पुणे सार्वजनिक सभेचे संस्थापक, गणेश वासुदेव जोशी उर्फ सार्वजनिक काका यांचे जयंती निमिताने पुष्पहार अर्पण करताना.
शिष्यवृत्ती
अण्णा भाऊ साठे यांचे स्मृतिदिनानिमित्ताने पुष्पहार अर्पण करताना संस्थेचे पदाधिकारी.
शिष्यवृत्ती
पुणे सार्वजनिक सभा, पुणे पितांबरी उधोग समुहाचे संचालक रविद्रजी प्रभुदेसाई आणि निवृत्त एअर मार्शल मा.भूषणजी गोखले यांचेसह विश्वस्त आणि कार्यकारी मंडळ.
पुणे सार्वजनिक सभेचे वतीने पितांबरी उधोग समुहाचे संचालक मा.रविदजी प्रभूदेसाई यांना सार्वजनिक काका पुरस्कार देताना सोबत निवृत्त एअर मार्शल मा.भूषणजी गोखले, अध्यक्ष नारगोलकर, कार्याध्यक्ष शिदोरे, सचिव गभे, कोषाध्यक्ष कालेकर, उपाध्यक्ष चन्ने.