स्थापना ( Year )

सभासद ( Member )

२ एप्रिल १८७० पुणे सार्वजनिक सभा ची स्थापना .. सामाजिक कामासाठी लोकांच्या प्रतिनिधींची (मुखत्यार) असावी अशी या संस्थेच्या स्थापने मागची भूमिका .. संस्थापक गणेश वासुदेव जोशी उपाख्य सार्वजनिक काका.. प्रथम अध्यक्ष श्रीमंत श्रीनिवासराव पंतप्रतिनिधी कार्यकारी मंडळात ख्रिस्ती पारशी मुसलमान इत्यादी मंडळींचा सुद्धा समावेश होता सार्वजनिक सभेचा प्रसार इतका होता की एक जून १८७३ रोजी भुसावळ येथे भुसावळ सार्वजनिक सभा स्थापन झाली.
सन १८७२ स्वदेशीच्या व्रताचा प्रसार सार्वजनिक सभेकडून निर्धाराने केला गेला.  स्वतः काकांनी अखेरपर्यंत स्वदेशी वस्तूचा  वापर केला.
सन १८७३  स्त्री विचारवती सभा स्थापून  पुणे सार्वजनिक सभेने सामाजिक सुधारणेच्या दृष्टीने  सर्व जातीमधील स्त्रियांसाठी पहिले हळदीकुंकू आयोजित केले. पाच हजार बहुजन समाजातील महिला उपस्थित होत्या.
सन १८७४ देशात नद्यांना आलेल्या पुरामुळे खानदेशात प्रचंड हानी झाली त्यावेळी पूरग्रस्तांना प्रथम तीन हजार व नंतर ४००० रू. ची देणगी पुणे सार्वजनिक सभेने पाठवली सन १८७५ मध्ये सोलापूर पुणे सातारा व नगर येथे डेक्कन राइट्स उफाळलेले दंगे याबाबत शासन दरबारी अहवाल साजरा करून इंग्रजांकडून डेक्कन ॲग्रीकल्चरिस्ट तयार करावीला ज्यामुळे शेतकरी वर्गाला दिलासा मिळाला सन १८७६ मध्ये १८७७ मध्ये दुष्काळाचा अहवाल सादर करून सरकारला दुष्काळग्रस्त कामे काढावीत धान्याचे भाव उतरावं गुराढोरांना योग्यतेचारा मेळावा दौंड मनमाड रेल्वेला गती मिळावी खडकवासला धरणाचा विस्तार करावा सांगितले गेले सांगितले गेले आज देखील या परिस्थितीत बदल नसून त्या गोष्टी किती पूर्वी दूरदृष्टीने सार्वजनिक सभेत मांडण्यात आल्या हे कळते १८७८ मध्ये दुष्काळग्रस्त भागाला रुपये १७००० सतरा हजार ची देणगी सार्वजनिक सभे कडून पाठवले गेली.

सन १८७६ दिल्ली दरबारात सार्वजनिक सभेच्या वतीने देण्यात आलेले मानपत्र ही देशातील जनतेचे ऐक्य व आकांक्षा सरकार दरबारी मांडण्याचे स्थान ठरले याचीच निष्पत्ती सन २७ डिसेंबर १८७६ *नेटिव्ह प्रेस असोसिएशन*ची स्थापना झाली राष्ट्रीय काँग्रेसची गंगोत्री म्हणूनच सार्वजनिक सभेला त्यानंतर ओळखले जाऊ लागले.

सात जुलै १८७६ सातारा येथे लवाद न्यायालयाची स्थापना १८७७ पुणे च्या मार्गदर्शनाखाली पुण्यात १४ ते १५ लवाद न्यायालयाची स्थापना यातून तंटे लवकरात लवकर निकाली ठरण्याच्या प्रक्रिया सुरू झाल्या आपापसात मिटण्याचे प्रकार वाढले.

सन १८७८ पुणे सार्वजनिक सभेच्या त्रैमासिकाची स्थापना हेच त्रैमासिक पुढे १८८९ ते १९२० पर्यंत प्रकाशित झाले.

२५ जुलै १८८० सार्वजनिक काकांचे निधन झाले.

ब्रिटिश सरकारने गेम रिझर्वेशन बिल.

सन २४\०३\१८८२ पुण्याच्या मुंसी पार्टीला तिचे पदाधिकारी निवडण्याचा अधिकार प्राप्त होण्यासाठी सार्वजनिक सभे कडून मागणी स्थानिक स्वराज्य कल्पना कानडी मुलखात पोहोचावी या दृष्टिकोनातून पुणे सभेने १८८३ मध्ये १६२५\ रुपये खर्च केले चा उल्लेख आहे तर १८८४ मध्ये सुरत भडोच अहमदाबाद येथे ३६ प्रचार सभांच्या आयोजन करून स्थानिक स्वराज्य संस्थेची कल्पना समजावून सांगितली त्यासाठी ४५० रुपये खर्च झाले.

सन १८८७ लॉरेन्स नाइटिंगेल यांनी ज्या खेडेगावांची लोकसंख्या ५०० पेक्षा जास्त आहे त्यांच्या आरोग्य संदर्भातील सरकारी तरतुदी बाबत जनजागृती करावी असे पत्र पुणे सार्वजनिक सभेस लिहिले

सन १८८७ लॉरेन्स नाइटिंगेल यांनी ज्या खेडेगावांची लोकसंख्या ५०० पेक्षा जास्त आहे त्यांच्या आरोग्य संदर्भातील सरकारी तरतुदी बाबत जनजागृती करावी असे पत्र पुणे सार्वजनिक सभेस लिहिले.

सन १८९५ सार्वजनिक सभेतील न्यायमूर्ती रानडे युगाचा अस्त .. नेमस्त.

सन १८९६ सार्वजनिक सभेत लोकमान्य टिळकांचा उदय जहाल पक्ष.

सन १८९६ कापडावर जकात बसविण्याच्या हिदुस्थान सरकारच्या धोरणा विरुद्ध जनजागृती.

सन १८९६ प्लेगच्या प्राणघातक साथी मुळे हिंदुस्थानी लोकांच्या आजारी माणसांची व्यवस्था होण्यासाठी निराळे हाॅस्पिटल असावे ही मागणी.

७\७\१९०१ जमीन महसूल त्या संबंधीचे कायदे आणि शेतकरी सावकार यांचे परिणाम या बाबत सभेचे निवेदन.

सन १७ मार्च १८९७ सार्वजनिक सभेची मान्यता काढून घेतली.

सन १९०७ बाॅम्बे स्वदेशी वस्त्र प्रचारिणी सभा स्थापन केली.

सन १९२० पुणे सार्वजनिक सभा ज्युबिली अंक.

  पुणे सार्वजनिक सभेने वेळोवेळी आयोजित केलेली जाहीर व्याख्याने व सभा यांकडे लक्ष देता काही विषय इथे मांडत आहे सन १९३० मध्ये महात्मा गांधींनी चालू केलेल्या सविनय कायदेभंगाच्या चळवळीत सहभागी झालेल्या पुणे सार्वजनिक सभेच्या ११ सभासदांनी हाल अपेक्षा व तुरुंगवास सहन केला.

१०\११\१९३३ लोकशाही स्वराज्य पक्ष व भावी घटना

८\१२\१९३३ विधायक राजकारण.

२८\१२\१९३३ अस्पृश्यांच्या प्रश्नांबरोबर उत्पन्न झालेले सामाजिक प्रश्न ग्रामोद्दार.

५ जानेवारी १९३४ जातीनिर्णयाचा निवाडा.

दोन फेब्रुवारी १९३३ मंदिर प्रवेश व मंदिर प्रवेश बिल.

१६\२\१९३४ धर्मात कायद्याचा प्रवेश होण्यासाठी मर्यादा.

२३\०२\१९३३ महाराष्ट्राचा पंचवार्षिक कार्यक्रम.

दोन मार्च १९३४ महाराष्ट्रातील तरुणांपुढील प्रश्न.

१७\९\१९३६ पुणे जिल्हा दुष्काळ निवारक मंडळाची सार्वजनिक सभेचे अध्यक्ष श्री न.चिं. केळकर यांच्या अध्यक्षतेखाली स्थापना.

सन १९\०१\१९३४ पोस्टाचे वाढलेले दर कमी करण्यासाठी लोकमत प्रदर्शन.

सन १९५०\५१ सार्वजनिक सभा सभासद संख्या १००.

सन २६ एप्रिल १९५२ संस्थेच्या इमारतीस भीषण आग मोठा ग्रंथसंग्रह संस्थेचे ८२ वर्षाचे रेकाॅर्ड आगीच्या भक्षस्थानी पडले कधीही न भरून येणारे नुकसान झाले.

सन १९६० ते आजतागायत अनेक शैक्षणिक संस्थात सभेच्या प्रसार झाला.

सन १९७०\१९७१ हिंदु मुस्लिम दंगली कायम स्वरूपी संपुष्टात याव्यात व राष्ट्रीय एकात्मता सांधली जावी म्हणून सभेचे तत्कालीन अध्यक्ष व पुण्याचे तत्कालीन महापौर गणपतराव नलावडे यांनी विशेष प्रयत्न केले.

सन २०२०\२०२१ जगाला ग्रासलेल्या करोना महामारी काळात लाखो लोक मृत्युमुखी पडले या काळात प्रतिबंधक लस कोविशील्ड ची दहा शिबिरे पुणे सार्वजनिक सभा ने आयोजित केली त्यात १८४१\ अठराशे एक्केचाळीस जणांचे लसीकरण केले.या कार्यक्रमास पुणे महानगरपालिका भवानी पेठ क्षेत्रिय कार्यालयाचे प्रमुख वैद्यकिय अधिकारी डाॅक्टर सारंग कालेकर व सार्वजनिक सभेचे विश्वस्त मंडळ कार्यकारी मंडळ यांचा सक्रीय सहभाग होता.

सन १९२१ संस्थेचा शतकोत्तर सुवर्ण महोत्सव दिमाखात साजरा झाला या वेळी स्मृतिगंध हा इतिहास प्रकाशित करून एक महत्त्वाचा दस्तावेज तयार झाला आहे.

संस्थेचा ईमेल punesarvajaniksabha@gmail.com असा आहे.

संकलक - सुरेश सोपानराव कालेकर


सार्वजनिक काकां चे सध्या चे वंशज
पणतू विष्णू उर्फ भाऊकाका केशव जोशी
श्रीमती विजया विष्णू जोशी
खापरपणतू विनायक उर्फ राजूकाका विष्णू जोशी
खापरपणतू विवेक विष्णू जोशी
खापरपणतू नरेन्द्र दत्तात्रेय जोशी
प्र खापरपणतू लोकेश विश्वास जोशी
प्र खापरपणतू हृषिकेश विनायक जोशी
प्र खापर पणती मधुरा भारदे मनाली जोशी
प्र प्र खापरपणतू व खापरपणती अवनी, आर्या, यश, रिया, सावी, सारा